गझल : सुधाकर झिंगाडे





आम्हाला पर्वा नाही प्राणाची देशासाठी

देऊ गर्वाने ग्वाही रक्ताची देशासाठी 


सैन्यांच्या शस्त्रास्त्राने सीमेच्या ज्वाला होती

मातीची उर्मी पेटे; धैर्याची देशासाठी 


योद्धे भूमीचे येथे वैऱ्याची दैना होई

भूमीची शक्ती गाथा ऐक्याची देशासाठी 


सामर्थ्याच्या तोफांनी धुव्वा शत्रूचा जागी

युद्धाची युक्ती नामी, अस्त्राची देशासाठी 


प्रेमाचे हिंदुस्थानी, शौर्याने शक्तीशाली

माला मोठी योद्ध्यांची त्यागाची देशासाठी 

.........…...................……......

सुधाकर झिंगाडे

मो. 8799923298

No comments:

Post a Comment