बोलणे* माझे ओबडधोबड
तिचे मौनही तीक्ष्ण नि परखड
घडू देईना* घरात संवाद^
सतत सुरू भांड्याची खडखड
सोपे सोपे शिकवून सारे*
पेपर त्याने काढले* अवघड
सोडून थकलो*, सुटली नाही
एक तुला बघण्याची आवड
मी, घर, नाते, नोकरी*, दुनिया
कशाकशाची घालू सांगड?
..…..........….......…...........
*या चिन्हांकित ठिकाणी मात्रा घटवल्या आहेत.
^ चरणान्ती आलेल्या 'द' ह्या अकारान्त अक्षराची मात्रा उर्दू परंपरेप्रमाणे मोजलेली नाही.
No comments:
Post a Comment