१.
मागतो मी न्याय केवळ गैर काही मागतो का?
हक्क माझे मागतो तर आज बोजा वाढतो का?
जाहिरातीवर उगाचच खर्च करतो रोज लाखो
अंथरुण पाहून अपुले पाय केव्हा पसरतो का?
सारखी लुटते तिजोरी भाबड्या जनमाणसाची
चतुर चौकीदार अपुला रोज दिवसा झोपतो का ?
जीवनाच्या शेवटीही व्याज सुद्धा फिटत नाही
फेडण्यातच शेत गेले देह तारण ठेवतो का ?
लोकशाही चालली ही दडपशाहीच्या दिशेने..
संविधानाला बघूया देश माझा तारतो का?
३.
खऱ्याला खऱ्याचा जरा भाव नाही
इथे फक्त सरडे, खरी धाव नाही
मनाने मनाचा जरा ध्यास घे तू
खऱ्याला पराभव नि पाडाव नाही
करावी किती तू विचारात भक्ती
प्रत्यक्षात येथे जरा वाव नाही
समाजास तू रे किती जाण द्यावी
खऱ्या कंटकाचा, इथे ठाव नाही
करोडो जनांचा, खरा बाप शिवबा
धनाची जराही कधी हाव नाही
...............................................

No comments:
Post a Comment