गझल : विजया टाळकुटे
का उघडली बोचक्यांची बंद शाळा?
तू मना शिकतो धडे की फक्त चाळा?
कोणती जादू तुझ्या स्पर्शात आहे?
काहिलीचा होत जातो पावसाळा
आटली सारी सुखे जेव्हा झऱ्याची
वेदना तेव्हा कुठे... हसली खळाळा
भांडणाचे चित्र भारी काढले तू
रंग त्या चित्रास देऊ की जिव्हाळा?
जी स्वतःचा शोध घेता धन्य झाली
तीच वारी विठ्ठलाचा ठोकताळा!
.............................................
छान
ReplyDelete