गझल : सीमा अनिल ताडगे

 




कदर कुणाची कुणाला किती?

समजावू मी जिवाला किती?


पैशासाठी नाते विकता

भाळतात जन धनाला किती?


कधीही पूर्ण होतच नाही

वाटते हाव मनाला किती?


सावली फक्त क्षणभराचीच

लळा लावला उन्हाला किती?


गरज संपली निघून गेले

लावले प्राण पणाला किती?


युद्धाने ना भले कुणाचे

दुःख वाटते रणाला किती?


घोड्यावर की चालू पायी

समजावू मी जणाला किती?


शिवार माझे वाट पहाते 

आळवू तरी घनाला किती ?

..............................................

No comments:

Post a Comment